लाॅकडाऊनच्या काळात हॅकिंगमध्ये दुपट्ट वाढ ...

कोरोनाव्हायरसच्या काळात हॅकर्स हल्ल्यांमध्ये वाढ होत असताना, सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट्स धमकीचा सामना करण्यासाठी एकत्र येत आहेत. वाढत्या सायबर धमक्यांविरुद्ध लढा देण्यासाठी जवळपास 400 सायबर सुरक्षा तज्ञांनी कोविड -१ C सीटीआय लीगचा भाग होण्यासाठी स्वेच्छेने काम करत आहेत. सध्या लाॅकडाऊन असल्यामुळे वेळ घालवायला अनेक जण अलीकडे इंटरनेट सर्फिंग मोबाइलवरून करण्यास प्राधान्य देतात. अनेक ठिकाणी व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक अकाउंट हॅक झाल्याचे समोर आले, त्यात फोन-पे,गुगल-पे असे apps लोक व्यवहारात वापरत आहेत, त्यातुन लोकांना OTP साठी विचारणा करून हॅकर्स पैसे चोरत आहेत. Email मध्ये .odt फाईल attached करुन पाठवले जात आहेत,अश्या फाईल अनओळखी email I'd वरून आले असतील तर ते ओपन न करणेच योग्य ठरेल.


मोबाइल कसे हॅक होतात?

- जीएसएम तंत्रज्ञान असलेल्या मोबाइल फोनला हॅक करण्यासाठी लागणारे हार्डवेअर सहज जोडता येते. त्यामुळे ते फोन हॅकर्सच्या जाळ्यात फसतात. - मोबाइल हॅक करण्यासाठी हॅकर्सकडून काही विशिष्ट ‘लिंक’ (मालवेअर असलेली) नागरिकांना पाठविली जाते आणि नागरिकांना फोन करून त्या लिंकवर पाठवलेले मेल, मेसेज उघडण्यास सांगण्यात येते. अनेकदा सरकारी कार्यालयातून बोलत असल्याचा बनाव करून नागरिकांशी संपर्क साधण्यात येतो. - हॅकर्स केवळ एक मेसेज पाठवून आपल्याला हवा त्याचा मोबाइल हॅक करून त्यावरील संभाषण, माहिती, छायाचित्रे मिळवू शकतात.हॅकर्स काय करतात?

- हॅकिंगमध्ये अनेकदा फोनमध्ये स्टोअर असलेली माहितीही बदलली जाते. - तसेच अनेक वेळा मोबाइलचा डेटा हॅक करून बँक खात्यातून परस्परच रुपये दुसऱ्या खात्यात वळविले जातात. - मोबाइलमध्ये सुरू असलेली सर्व अॅप्लिकेशन्स अगदी मेल, फेसबुक, ट्विटरसुद्धा हॅक केली जातात. मेलमध्ये असलेल्या डाटाचा वापर करीत ‘क्रेडिट, डेबिट’ कार्डची गोपनीय माहिती मिळवून त्याद्वारे लाखो रुपये काढले जातात. - हॅकर्सने काही बँकांकडील ग्राहकांच्या क्रेडिट कार्डचा ‘डेटा’ हॅक केलेला आहे. हॅकर्सने अनेक बँकांचा ‘डेटा’ मिळविला आहे. या क्रेडिन्शिअलचा वापर करून ऑनलाइन लूटमार करण्यासाठी हॅकर्स ग्राहकांच्या मोबाइलमध्ये मालवेअर पाठवितात.


हॅकर्सकडून ‘ओटीपी’चा वापर

हॅकर्सकडून शक्यतो लूटमार करण्यासाठी रात्रीची वेळ निवडण्यात येते. हॅकर्सने मोबाइल हॅक केला असल्याने त्यांना पैशांचे ऑनलाइन व्यवहार करताना लागणारा ‘वन टाइम पासवर्ड’ (ओटीपी) लगेचच मिळतो. या पासवर्डचा वापर करून ते ऑनलाइन लूटमार करतात.


व्हॉट्सअॅप-फेसबुक अकाउंट हॅक कसे होते?

व्हॉट्सअॅप-फेसबुक अकाउंट हॅक करून अश्लील मेसेज पाठविले जातात. व्हॉट्सअॅप किंवा फेसबुक रिइन्स्टॉल करताना संबंधित कंपनीकडून ‘ओटीपी’ पाठवण्यात येतो. या पासवर्डच्या मदतीनेच आपण संबंधित अॅप्लिकेशन वापरू शकतो. हॅकर्स परिचितांपैकी एकाचा मोबाइल हॅक करून त्यावर व्हॉट्सअॅप रिइन्स्टॉल करण्याचा ‘ओटीपी’ मिळवून व्हॉट्सअॅप हॅक करतात आणि नंतर कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये पोहोचून इतरांचे मोबाइल हॅक करण्याचा सपाटा सुरू करतात. व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक करून रिइन्स्टॉल करताना नागरिकांच्या मोबाइलवर ‘ओटीपी’ आल्यावर हॅकर हॅक केलेल्या अकाउंटवरून काही भूलथापा मारून ‘ओटीपी’ पाठवण्याबाबत विनंती करतो. आपल्या ओळखीतील व्यक्ती मदत मागते म्हणून संबंधितांना तो मेसेज फॉरवर्ड करतो. अशा रीतीने हॅकर सहजपणे हॅकिंग करू शकतो.


हॅक झाल्याचे लक्षण कोणते?

 • अचानक रिस्टार्ट होणे, एकदम शटडाउन होणे.
 • मोबाइलमधून आपोआप एसएमएस पाठवला जाणे.
 • -
 • मोबाइलमधील अॅप्स अनपेक्षितरित्या सुरू किंवा बंद होणे.


आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या..

- - -

 • पैसे देण्यापूर्वी केवळ चॅटिंगवर विसंबून न राहता मोबाइलवर बोलून खात्री करून घ्यावी.
 • मेलमध्ये किंवा एसएमएसमध्ये आलेली अनोळखी लिंक उघडू नये आणि ती लिंक चुकून उघडल्यास मोबाइल फॉरमॅट करून घ्या.
 • अनोळखी व्यक्ती मेसेज किंवा मेल करीत असेल तर त्याला ब्लॉक करणे योग्य ठरेल.


हॅकिंगपासून कसे वाचाल?

 • ब्ल्यू टूथ वापरत असाल, तर ते बंद किंवा इनव्हिजिबल मोडमध्ये ठेवा.
 • त्याशिवाय फोन सतत अपडेट करा. म्हणजे त्यातील कार्यक्रम तुम्हाला सतत समजत राहील.
 • फोनला पासवर्ड ठेवा. त्यामुळे दुसरा कोणीही तुमच्या फोनचा वापर करू शकणार नाही.
 • मोबाइलवर आलेला कोणताही अनोळखी मेसेज अथवा लिंक पाठवली गेली असेल, तर ती उघडू नका. मेलमधीलसुद्धा अनोळखी लिंक उघडू नका.
 • अँटिव्हायरस अॅप इन्स्टॉल करा.
 • मोबाइलचा आयएमईआय क्रमांक शेअर करू नका.
 • Email मध्ये .odt फाईल attached करुन पाठवले जात आहेत,अश्या फाईल अनओळखी email I'd वरून आले असतील तर ते ओपन न करणेच योग्य ठरेल.

लोकांच्या प्रतिक्रिया

शिवरायांबद्दल प्रत्येकाच्या मनामनात प्रेम, आदर आणि निष्ठा आहे, आपल्या शिवरायांसाठी एक लाईक तर बनतोच... theideasplanet.com site व page ला फाॅलो/लाईक करा.